Vitthal Parivaar Trustee


डॉ.ज्ञानेश्वर सहदेवजी नेमाडे

रा.शेगांव, जि.बुलडाणा मो.९८२२३६५१६० व्यवसाय डॉक्टरी पेशा. सौ.सुद्धा डॉक्टर. शेगाव येथे स्वत:चे क्लिनीक. वारकरी कुटुंबात जन्म वडील ह.भ.प. सहदेवजी नेमाडे. उपजतच कीर्तन प्रलचन संत सानिध्यात असल्यामुळे वडील यांची कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जनसेवा. असा हा वारसा लाभलेले डॉ.ज्ञानेश्वर यांनी मागील पांच वर्षापासून विठ्ठल परिवाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी व्यवसाय बाजूला ठेवून विठ्ठल परिवारासाठी नामजपाच्या माध्यमातून अविरत सेवा करुन नि:स्वार्थ बुद्धीने परिवाराचे उच्चतम साधक म्हणून विठ्ठलनामाचा प्रचार. आळंदी-पंढरपूर येथे स्वत:च्या पैशाने जागा विकत घेवून परिवाराचे प्रसार व प्रचार सहित नि:स्वार्थ मदतीचा हात. विठ्ठल परिवाराचे कोणत्याही कुठल्याही कार्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग. मुलगा व मुलगी सुद्धा नव्हे संपूर्ण कुटुंब विठ्ठल परिवारात निष्ठेने जुळलेले. असे परिवाराचे लाडके व्यक्ति म्हणजे डॉ.ज्ञानेश्वर सहदेवजी नेमाडे.


जगन्नाथजी सखारामजी वानखेडे

नाव - जगन्नाथजी सखारामजी वानखेडे जन्म - ०७-०४-१९९५ शिक्षण - कृषी पदविका नोकरी - पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला कृषी अधिकारी कापूस संशोधन विभाग कालावधी - ३३ वर्षे एकाच ऑफीसमध्ये १९८० पासून निवृत्त - एप्रील २०१३ शेतकरी कुटुंबात जन्म वयाच्या १५ व्या वर्षापासून पायदळ वारी, पंढरपूर, आई- वडीलांसोबत. आजतागायत अखंड आषाढी वारी सुरू. छंद - परमार्थ आवड, मृदंग वाजविणे, कथा, पोथी वाचन, गावामध्ये धार्मिक कार्यात सहभाग. सचिव - श्री संत आदिशक्ती मुक्ताई मंडळ अकोला १९८८ सचिव - मराठा स्नेहसंवर्धन मंडळ अकोला १९८५ सचिव - स्वामी विवेकानंद विद्या मंदीर कुवâसा, वाशिम २०१५ सचिव - विठ्ठल परिवार महाराष्ट्र राज्य विशेष - नोकरीमध्ये उत्कृष्ठ कर्मचारी पारितोषिक ४५ वर्षे एकनाथी भारूड मास्टर, स्टेज कार्यक्रम पत्ता - कुकसा, पो.अंचळ, ता.रिसोड, जि.वाशिम मो.नं. ७५८८९६२२०७


लाभेष रविंद्र बडगुजर

झेंडा चौक, राजापेठ, अमरावती, ता.जि.अमरावती जन्मतारीख : १०-०१-१९९५ आय.टी.आय./ग्रॅज्युऐशन श्री विठ्ठल परिवार ट्रस्ट महाराष्ट्र राज्य चे कार्याध्यक्ष व्यवसाय - डिझल गाड्यांचे पंप नोझल दुरूस्तीचे काम. शेतकरी कुटुंबात जन्म. लहानपणापासून घरा शेजारील होणार्‍या भागवत सप्ताहामध्ये तसेच इतर कुठल्याही धार्मिक सामाजिक कार्यात सहभाग. तबला वाजवणे, स्वीमींगचा छंद असणारे धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होणारे. ज्ञानाई वारकरी बाल सुसंस्कार शिबीराचे व्यवस्थापक, गुजर / बडगुजर समाज विकास बहुउद्देशिय संस्थेचे सहकोषाध्यक्ष म्हणून नावलौकीक मिळविणारे तसेच विशेष म्हणजे मा.ना.श्री.श्रीकांतजी देशपांडे साहेब (राज्यमंत्री)शिक्षण हक्क कायदा परिषद तथा राज्य सलाहकार परिषद (उपाध्यक्ष) यांचे विधान मंडळ कार्यालयीन सचिव खाजगी सचिव


श्री.दयानंद ज्ञानोबा मेदनकर

मु.शेल पिंपळगाव, ता.खेड, जि.पुणे विठ्ठल परिवाराचे खजीनदार व्यवसाय - व्यापारी धार्मिक कार्याची आवड कुटुंब संपूर्ण पारमार्थिक व विठ्ठलमय. पायी वारकरी आळंदी ते पंढरपूर, परमार्थातच रममाण होणारे, श्री विठ्ठल परीवार महाराष्ट्राचे खजीनदार म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळणारे श्री विठ्ठल नामाचा प्रचार आणि श्री विठ्ठल परिवाराचा प्रसार करण्यातच धन्यता माननारे, श्री विठ्ठल परिवाराकरीता अविरत निस्वार्थ सेवा देणारे परिवाराचे जबाबदार व्यक्ती.


ह.भ.प.गौरव (महाराज ) सुरेशराव पाचघरे, महाराज

रा.अमरावती, जि.अमरावती. वय ३५ वर्षे. लहानपणापासूनच परमार्थाची आवड असलेले वारकरी सांप्रदायाचे बाळकडू मिळालेले. वारकरी संस्था आळंदी येथे शिक्षण घेवून कीर्तन, भजन, प्रवचन, विठ्ठल कथा करणे. पंढरपूर येथे निवास. श्री विठ्ठल परिवाराचे स्वीकृत सदस्य, आजन्म विठ्ठल परिवाराचे उच्चतम साधक. विठ्ठल परिवाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी सतत आग्रही असणारे. विठ्ठल परिवारासाठी अविरत सेवा करुन नि:स्वार्थ बुद्धीने परिवाराची सेवा करत राहणारे व्यक्तीमत्व.




श्री.संदीपजी पालवे

सदस्य, विठ्ठल परिवार महा.राज्य. जळगांव खांदेश कडील मुक्ताबाई चा पारमार्थीक वारसा लाभलेले अतीप्रेमळ कुटुंबात जन्म. शिक्षकी पेशा असुन, बी.ए.बी.एड. पर्यंत शिक्षण झालेले असुन आपल्या प्रेमळ व विनम्र स्वभावाने सर्वांना आपलंसं करुन घेतलेले विठ्ठल परिवारातील सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व म्हणजे पालवे सर, वडील नोकरी निमित्त अकोला येथे येऊन येथेच स्थाईक झालेत. थोरले बंधू लेक्चरर, आईने आपल्या अतीप्रेमळ स्वभावाने कुटुंबाला एका माळेत ओऊन ठेवले आसुन संपूर्ण कुटूुंबाने श्री विठ्ठल परिवाराला वाहून घेतलेले आहे. लहानगी मुलगी कृष्णाली ही खुप मधुर आवाजामध्ये विठ्ठल नामजप करते. विठ्ठल परिवाराचे हिशोबनीस म्हणून प्रामाणिकपणे विठ्ठल परिवाराची निस्वार्थ सेवा.


ह.भ.प. हेमंतजी मराठे

सदस्य, विठ्ठल परिवार महा.राज्य जन्म - २३ जुलै मु.चोरोची, ता.कवठे महांकाळ, जि.सांगली मो. ९९२३५९२२८३ गरीब कुटुंबात जन्म लहानपणापासून परमार्थाची आवड. उदरनिर्वाहासाठी टेलरिंग फर्म चोरोची येथे व्यवसाय. प्रामाणिक, होतकरु गरीबाच्या कार्यात मदत. संत संगतीत राहून, लोकांना व्यसनमुक्त बनविने व विठ्ठलपरिवाराला जुळविणे. नि:स्वार्थ परिवाराची सेवा. सतत परमार्थमय व्यवहार करून, विठ्ठल परिवाराच्या प्रसार व प्रचार कार्याची अगदी तळमळीने सांगली परिसरात प्रचार हेच एकमेव उद्दिष्ठ ठेवून कार्य करणे. तसेच कीर्तन, प्रवचन, समाज प्रबोधन श्रीराम कथा आणि श्री विठ्ठल कथा गावोगावी करून विठ्ठल परिवाराचा प्रसार आणि प्रचार.